Monday , September 21 2026
Breaking News

आमदार रोहित आर आर पाटील यांनी घेतली दळवी कुटुंबियांची सांत्वनपर भेट

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांची आज शुक्रवारी सांगली जिल्हा, कवठेमहांकाळ तालुक्याचे आमदार रोहित आर आर पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपले आयुष्य वेचणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे झुंजार व्यक्तिमत्त्व असलेले अध्यक्ष दीपक दळवी यांचे 17 मार्च रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सीमा भागात शोककळा पसरली होती.
यावेळी सर्व श्री. बुलंद दळवी व दळवी कुटुंबिय, विनोद हंगिरकर, दिंगबर पवार, सागर पाटील, रमेश रायजादे, लक्ष्मण नाईक, कुणाल दळवी, माजी नगरसेवक अनिल पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *