Monday , September 21 2026
Breaking News

येळळूर येथे समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान

Spread the love

 

येळळूर : आजच्या आधुनिक युगात वावरत असताना आई, बाबा व मुलांच्या नात्यातील वाढत चाललेला दुरावा आणि बिघडत चाललेली समाजव्यवस्था, आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे. यावर समाज प्रबोधन व्हावे आणि कुटुंबातील एकोपा कायम टिकून राहावा, यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान व महाराष्ट्र एकीकरण समिती, येळळूर यांच्या वतीने रविवारी (ता.५) सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र चौक येथे वसंत हंकारे यांचे ‘चला जाणून घेऊया आई-बाबांच्या वेदना’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रमाकांत कोंडुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून या कार्यक्रमाबाबत जनजागृतीची बैठक नुकतीच पार पडली. व्याख्यानाचा लाभ विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही घ्यावा, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तान व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *