Monday , September 21 2026
Breaking News

साखरवाडीतील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. पाटील यांच्याकडून ५१ हजाराची देणगी

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील साखरवाडी येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कार्यास सर्व स्तरांतून भाविक सढळ हाताने मदत करत आहेत. येथील सुप्रसिद्ध डॉ. एम. बी. पाटील यांनी ५१ हजार रुपयांची देणगी मंदिर निर्माण कार्यास सुपूर्द केली.
हनुमान जयंती निमित्ताने मंदिरा ठिकाणी मंदिराचे विश्वस्त माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांच्याकडे सदर निधी देण्यात आला.
यावेळी चंद्रकांत जासूद यांनी, हनुमान भक्तांच्या अपेक्षानुसार निपाणी भागातील वैभवात भर टाकणाऱ्या संगमरवरी सुंदर अशा मंदिराचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आले आहे. श्री हनुमान मुर्तिचे नूतन गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे १.५० कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आला आहे. या निधीच्या उपलब्धतेसाठी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय बांधव, कर्नाटक शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात आले आहे. यापुढील कामासाठी आणखी निधीची आवश्यकता असून यासाठीही सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जासूद यांनी केले.
यावेळी गीता पाटील, डॉ. विनायक पाटील, डॉ. ऐश्वर्या पाटील, सचिन पोवार, सुरेश बोरगावे, अतुल चावरेकर, प्रथमेश जासूद यांच्यासह भावीक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *