Monday , May 25 2026
Breaking News

बोरगाव वड्डर समाजातर्फे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव शहर आणि परिसरात हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.हनुमान जयंतीच्या निमित्ताने बोरगाव येथे वड्डर समाजातर्फे वतीने आयोजित हनुमान जयंती उत्सव प्रसंगी मूर्तीस अभिषेक घालून महिलांनी पाळणा सादर केला. त्यानंतर भाविकांना सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी पूजा-अर्चा, भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, मंदिरास भेट देऊन हनुमंताचे दर्शन घेतले. पाटील यांनी, समाजात एकता, धैर्य आणि सेवाभाव वाढवण्याचे काम समाज बांधवांनी करावे. हनुमान हे शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक असून त्यांच्या आदर्शांवर चालत युवकांनी समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, नगरसेवक अभय मगदूम, तुळशीदास वसवाडे, माजी नगराध्यक्ष संगप्प ऐदमाळे, वड्डर समाजाचे अध्यक्ष आकाश वड्डर, उपाध्यक्ष सुनील वड्डर, खजिनदार अविनाश वड्डर, सेक्रेटरी प्रशांत वडर, रुपेश वड्डर, राजू वडर, बजरंग वडर, सौरभ वड्डर, प्रसाद वडर, धनपाल वड्डर, मनोज वड्डर, विश्वास वड्डर, राजाराम वड्डर यांच्यासह वड्डर समाजाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *