Thursday , April 9 2026
Breaking News

चिन्मयी उप्पार पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरी

Spread the love

 

सृष्टी संतोष हलकर्णी ही रायजिंग स्टार अवॉर्डची तर प्रत्यक्ष आनंद घिवारी ठरला विद्यार्थी रत्न पुरस्काराचा मानकरी

बेळगाव : ज्ञानसागर स्कुलची विद्यार्थिनी चिन्मयी केंपन्ना उप्पार ही ‘पर्ल ऑफ ज्ञानसागर 2025-26’ पुरस्काराची मानकरी ठरली. सृष्टी संतोष हलकर्णी हिने ‘रायजिंग स्टार अवॉर्ड 2025-26’ हा पुरस्कार पटकाविला तर प्रत्यक्ष आनंद घिवारी हा ‘विद्यार्थी रत्न 2025-26’ पुरस्काराचा मानकरी ठरला.
समर्थनगर प्रभागाच्या नगरसेविका नेत्रा भागवत, निवृत्त आर्मी पोलीस परशराम बेकवाडकर, सामाजिक कार्यकर्ते आणि श्री एकदंत युवक मंडळाचे पदाधिकारी संतोष कणेरी, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव, पत्रकार रवींद्र जाधव यांच्या हस्ते चिन्मयी केंपन्ना उप्पार, सृष्टी संतोष हलकर्णी आणि प्रत्यक्ष आनंद घिवारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नर्सरी विभागात 100 टक्के गुण घेऊन पहिला क्रमांक मिळविलेल्या सृष्टी हलकर्णी, शौर्य शेठ, सुकृती कंग्राळकर, सानवी उप्पार, स्वराज्य जालगार, दुसरा क्रमांक मिळविलेल्या क्रिशा बैलाप्पगोळ तसेच अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक मिळविलेल्या श्रीसैल वस्त्रद व धृती शिगिहळ्ळी, एलकेजी विभागात पहिला क्रमांक पटकाविलेल्या प्रत्यक्ष आनंद घिवारी, दुसरा क्रमांक घेतलेल्या अरुंधती कम्मार तसेच अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविलेल्या आराध्या भातकांडे, आरोही मडीवाळ आणि अमित विटेकर यांचा तसेच युकेजी विभागात 100 टक्के गुण घेऊन पहिला क्रमांक मिळविलेल्या चिन्मयी उप्पार, 99.08 टक्के गुणासह दुसरा क्रमांक पटकाविलेल्या प्रमिता बुल्ली, तिसरा क्रमांक घेतलेल्या दिव्यांश प्रजापती तर चौथा क्रमांक मिळविलेल्या आरोही बांडगी यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरी चिन्मयी केंपन्ना उप्पार हिने मनोगत व्यक्त केले. नगरसेविका नेत्रा भागवत यांनी गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षिका सुधा मुचंडी, स्वाती कंग्राळकर यासह पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रोत्साह फाउंडेशनच्यावतीने एसीपी सत्यनायक यांचा सन्मान

Spread the love  बेळगाव : बेळगाव मार्केट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *