
बेळगाव : खडेबाजार शहापूर येथील श्री बसवाण्णा देवस्थानच्या वतीने आज बसवाण्णा यात्रेच्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल सोमवारी वाजतगाजत गाड्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी अभिषेक, पुजा, आरती आदी धार्मिक विधी संपन्न झाले.
त्यानंतर सायंकाळी निखाऱ्यावर चालण्याचा पारंपरिक इंगळ्याचा कार्यक्रम पार पडला.
बसवाण्णा यात्रेला शहापुर, वडगाव, खासबाग परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
Belgaum Varta Belgaum Varta