Wednesday , March 4 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार-2022 जाहीर

Spread the love


बेळगाव : सालाबादप्रमाणे शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यंदाचे पत्रकार पुरस्कार-2022 जाहीर करण्यात आले असून येत्या रविवार दि. 17 एप्रिल सायंकाळी 5:30 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.
यंदा वाचनालयाच्या पत्रकार पुरस्काराकरिता मराठी विभागासाठी दै. तरुण भारत गोवा निवासी संपादक सागर जावडेकर आणि कन्नड विभागासाठी न्युज हंट कन्नड चिकोडी वार्ताहर चंद्रशेखर एस. चिनकेकर यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार 2022 साठी मराठी विभागात बेळगावचे साप्ताहिक सहकार दर्शनच्या व्यवस्थापकीय संपादिका वसुधा कानूरकर-सांबरेकर, कन्नड विभागात दैनिक प्रजावणी हुबळी ब्युरो चीफ रश्मी एस. यांना जाहीर झाला आहे.
गणपत गल्ली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी हे पत्रकार पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *