
बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन असलेल्या श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार व शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री वारकरी भजनाचा कार्यक्रम झाला.
शनिवारी पहाटे चार वाजता हनुमान मूर्ती अभिषेक, पाच ते सात वाजेपर्यंत श्रीकृष्ण मूर्ती बोंगळे यांचे कीर्तन झाले त्यांनी हनुमंताच्या जन्माची कथा कीर्तनातून सादर केली, सूर्योदयास जन्मकाल व आरती झाल्यानंतर सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोणामुळे बंद असलेल्या महाप्रसादाचे यंदा आयोजन करण्यात आले होते. अनगोळ येथील भक्त श्री गोपाल होंगल यांच्या सहकार्यातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात आला. ज्याचा परिसरातील हजारो भाविक स्त्री-पुरुषांनी लाभ घेतला. याप्रसंगी महाप्रसाद देणारे गोपाल होंगल, महाप्रसाद बनविणारे ज्योतिबा कोले व वार्ड नंबर 41 चे नगरसेवक श्री. मंगेश पवार यांचा ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांच्याहस्ते शॉल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. महाप्रसादाचे निमित्ताने आज अनेक उद्योजक व महनिय व्यक्तीनी मंदिरास भेट देऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला. अनेकानी सढळ हस्ते देणग्याही दिल्या. याप्रसंगी कमिटीचे उपाध्यक्ष कुलदीप भेकेणे, सेक्रेटरी प्रकाश महेश्वरी, सदस्य बाबुराव पाटील, गोपाळराव बिर्जे, नेताजी जाधव, रघुनाथ बांडगी, संभाजी चव्हाण, अनंत लाड, सुनिल चौगुले यांच्यासह विक्रम चिंडक, के. ए. साळवी व पुजारी बालु किल्लेकर आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta