बेळगाव (वार्ता) : आषाढी एकादशी निमित्य तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांनी आयोजित केलेल्या नाद ब्रम्ह ऑनलाईन भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज सोमवार दिनांक 9ऑगष्ट रोजी दुपारी 3 वा. महिला विद्यालय मराठी शाळेच्या सभागृहात होणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक सौ. रुक्मिणी निलजकर वैशाली स्टोन क्रशर या आहेत. या स्पर्धेला सीमाभागातील महिला भजनी मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
जरी हि स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली असली तरी एकापेक्षा एक दर्जेदार भजने सादर करण्यात आली.
‘टाळ बोले चिपळीला’, ‘नाम गाऊ नाम घेऊ’, ‘अरे कान्हा कृष्ण मुरारी’, ‘गवळण मथुरेला निघाली, अशा भजनाचे सादरीकरणं महिलांनी
केले. मार्गदर्शक व प्रशिक्षक विजय बांदिवडेकर हे आज भजनी मंडळांना भजन कसे सादर करावे तसेच गवळण, अभंग तालबद्ध व सुरात कशी गावी यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या स्पर्धेमध्ये जवळ जवळ बेळगांव शहरं व सीमाभागातून 26 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील विजयी स्पर्धक आहेत.
प्रथम क्रमांक…
साईराम भजनी मंडळ, टिळकवाडी
द्वितीय क्रमांक विभागून..
स्वरगंध भजनी मंडळ, शहापूर
मुक्ताई भजनी मंडळ, कंग्राळी खुर्द
तृतीय क्रमांक विभागून..
जिव्हेश्वर भजनी मंडळ, वडगांव
गौरी भजनी मंडळ, वडगांव
ओम नमः शिवाय भजनी मंडळ, कंग्राळी खुर्द
उत्तेजनार्थ..
दुर्गा भजनी मंडळ, संभाजी रोड
पार्वती भजनी मंडळ, वडगांव
जनाबाई महिला भजनी मंडळ, भारतनगर
तरी सर्व सदस्य विजेत्यांनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.