खानापूर प्रतिनिधी) : खानापूर येथील न्यायालयात शनिवारी मेघा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी या मेघा लोकअदालतीतून २३ तक्रारी निकालात निघाल्या.
मेघा लोकअदालतीला बेळगाव जिल्हा न्यायाधिश श्री. हेमंतकुमार, न्यायाधिश शिरोळी, खानापूर न्यायाधिश पी. मुरलीमनोहर रेड्डी, एस. सुर्यनारायण तसेच खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी होते.
शनिवारी झालेल्या स्पेशल मेघा लोकअदालतमध्ये सहकारी क्षेत्रातील सोसायटीच्या तक्रारी, वाटणी, चेकबाॅन्स, आदी तक्रारी निकालात काढण्यात आल्या.
यावेळी तक्रारी निकालात काढण्यात आलेल्या पक्षकाराचा न्यायाधिशांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या अदालतीमध्ये श्रीमहालक्ष्मी सोसायटी, हनुमान सोसायटी, दुर्गामाता सोसायटी, कर्मचारी वर्गाने उत्तम सहकार्य केले. ही लोक अदालत येत्या १४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
यावेळी ऍड. एस के नंदगडी, ऍड. के पी कळेकर, ऍड. एम वाय कदम, ऍड. मदन देशपांडे, ऍड. ए एम देसाई, ऍड. एम ए मुल्ला, ऍड. आर एम हिरेमठ, ऍड. आर एन पाटील, ऍड. जी जी पाटील, ऍड. सुरेश भोसले आदी उपस्थित होते.
