खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला.
खानापूर तालुक्यातील समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गाव गर्लगुंजी या गावातून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा जाहिर करून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याला सीमाभागातून मोठा पाठिंबा मिळत आहे, आज सीमालढ्यात मोठं योगदान असलेल्या गर्लगुंजी ता.खानापूर गावातून तीन हजाराहुन अधिक पत्रं पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी गोपाळ पाटील, चनापा मेलगे, संतोष पाटील, सोमनाथ यरमळकर, बी एम चौगुले, मारुती वड्डेबैलकार, सहदेव मेलगे, अभिनय नीटूरकर, निऋति मेलगे, महेश सुतार, परशराम भातकांडे, कृष्णा गोरे, शंकर निटूरकर, परशराम बाबीचे, मारुती गोरे आदी उपस्थित होते.
