बेळगाव : जुना गुडशेड रोड, गोडसे कॉलनी येथील वन टच फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मोहनगा दड्डी येथील गरीब हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठणार्या एका महिलेला तीन महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, वन टच फाउंडेशनचे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांना अलिकडेच मोहनगा दड्डी येथील सामाजिक कार्यकर्त्यां सेंथिया फर्नांडिस यांचा फोन आला.
त्यांनी गावातील सलमा हयातखान नामक मुस्लीम महिला अतिशय गरीब परिस्थितीत राहतेय. तिचा पती आणि नातेवाईक नाहीत. दोन लहान मुले असलेल्या सलमाकडे रेशन कार्ड अथवा आधार कार्ड नाही. स्वतःचे घरही नसल्यामुळे तिला मदतीची गरज असल्याचे सांगितले.
तेंव्हा विठ्ठल पाटील यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला. वन टच फाउंडेशनच्या महिला सदस्या सुप्रिता शेट्टी, वैशाली मोरे, माधुरी माळी, कु. वैष्णवी भातकांडे, कल्पना सावगावकर, वैशाली पाटील, धनश्री पाटील या सर्वांनी त्या कुटुंबाला तीन महिने पुरेल इतके 50 किलो तांदूळ, तेल पाकिटे, साखर, चहा पावडर, पोहे, तिखट पाकीट, हळद पाकीट, मीठ, कांदे, तुरडाळ, चनीडाळ, मूग, मटार, हरभरा, मसूर, बिस्किट पाकीट, साबण, व्हील पावडर, एक चादर आदी जीवनावश्यक साहित्य स्वतः जमा केले.
सदर सर्व साहित्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील आणि कल्पना सावगावकर यांनी बेळगावपासून सुमारे 50 कि. मी. अंतरावरील दड्डी येथे जाऊन समक्ष भेटून सलमा हयातखान यांच्याकडे ती मदत सुपूर्द केली. सदर मदतीमुळे भावनाविवश झालेल्या सलमा यांनी कृतज्ञता व्यक्त करून विठ्ठल फोंडू पाटील यांचे आभार मानले.
Check Also
मराठा लाईट इन्फंन्ट्रीमध्ये अग्नीवीरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात….
Spread the love बेळगाव : 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 651 अग्नीवीर जवानांचा शानदार …