
बेळगाव : बेळगावच्या बाग परिवाराचा काव्य वाचनाचा बहारदार कार्यक्रम रामदेव गल्लीतील गिरिश कॉम्प्लेक्सच्या भगतसिंग हॉलमध्ये मोठ्या उत्साहाने पार पडला. निमीत्त होते जेष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे!
शांता शेळकेंच्या विपुल साहित्या पैकी काही निवडक गिते, कविता आणि ललित लेख अशा साहित्याचे सादरीकरण बाग परिवारातील कवींनी करुन मनमुराद आस्वाद घेतला आणि
त्यांना मानवंदना दिली.
कार्यक्रमात सुरुवातीला चंद्रशेखर गायकवाड यांनी ‘गणराज रंगी नाचतो’ या कवितेने केली. अस्मिता आळतेकर – ‘बसच्या रांगेत उभी एक पोर’, निकीता भडकुंबे -‘शब्द’, अंजली देशपांडे- ‘चांदण्या रात्रीतले ते’ भरत गावडे – ‘मानाचा मुजरा’, अपर्णा पाटील- ‘सर्व तू विसरुनी जा’, डॉ. मेघा भंडारी – ‘पाऊस’, अस्मिता देशपांडे- ‘पैठणी’, अशा कविता सादर केल्या. स्मिता किल्लेकर यांनी ‘काय बाई सांगू’ हे गीत, रोशनी हुंदरे यांनी ‘असेन मी नसेन मी’ हे गीत वेगळ्या शैलीत सादर केले. प्रा.मनिषा नाडगौडा यांनी शांता शेळके यांची विविध गीते घेऊन ‘शालू हिरवा पाचूनी मढवा’ या गीतासहित सुंदर रिमिक्स सादर केले आणि सर्वांना टाळ्यांचा ठेका धरावासा वाटला. तर आरती पाटील यांनी शांता शेळकेंचा ‘तोडे’ हा ललित लेख सादर केला. अधून मधून डॉ. मेघा भंडारी यांनी शांता शेळकेंच्या साहित्यिक प्रवासाचे वर्णन सुत्रसंचालनातून प्रभावीपणे केले. प्रास्ताविक निकीता भडकुंबे व आभार प्रा. मनिषा नाडगौडा यांनी मानले. कार्यक्रमास मुक्ता पाटील, कवी मधु पाटील उपस्थित होते. खुपच रंगतदार असा हा कार्यक्रम झाला.
Belgaum Varta Belgaum Varta