
बेळगाव : बंधू रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील सीडी प्रकरणानंतर आता केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांच्या नावाला कलंक फासण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सतीश जारकीहोळी यांच्या नावानं पॉर्न साईटवर अश्लील व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
अश्लील वेबसाईटवर सतीश जारकीहोळी यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही हितशत्रूंनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सतीश जारकीहोळी यांचे समर्थक विजय तळवार यांनी बेळगावच्या सीईएन पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. समाजमाध्यमांवर सतीश जारकीहोळी यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांची बदनामी करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta