Tuesday , March 3 2026
Breaking News

कुसनाळला मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी

Spread the love


अथणी : कृष्णा नदीला महापुरानंतर बुडणार्‍या कुसनाळ गावचे स्थलांतर केले आहे. येथील मूलभूत सुविधांसाठी 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, कामाला प्रारंभ झाला. याचा शुभारंभ कागवाडचे आ. व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर बुडणारे कुसनाळ गावचे स्थलांतर व्हावे, अशी अपेक्षा आ. श्रीमंत पाटील यांनी यापूर्वीच राज्य शासनाकडे मांडली होती. त्याची दखल घेऊन या गावाचे शासनाने यासाठी गावापासून काही अंतरावर कुसनाळच्या स्थलांतरासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. आता येथे मूलभूत सुविधांची गरज असल्याने त्यासाठी आमदारांकडून पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पुनर्वसन परिसराला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मंगळवारी येथील विकासकामांना आ. श्रीमंत पाटील यांच्याहस्ते प्रारंभ झाला. या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी आ. पाटील यांनी येथील ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली, उपनिरीक्षक बी. एम. रबकवी, पाटबंधारे खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता प्रवीण हुनशीकट्टी, एन. सी. पवार, विनय कोळी, उगार बीके पंचायतीचे अध्यक्ष आण्णागौडा शीतल पाटील, कुसनाळ व मुळवाड गावचे प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *