Tuesday , March 3 2026
Breaking News

कुसनाळला घराचे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत

Spread the love


अथणी : वादळी पावसामुळे घरावर झाडे पडून व पत्रे नुकसान झालेल्या कुसनाळ (ता. कागवाड) येथील पाच जणांना आर्थिक मदत दिली. श्रीमंत पाटील फाऊंडेशनच्यावतीने कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी प्रत्येकाकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
कागवाड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक घरांवर झाडे पडून व सोसाट्याच्या वार्‍यामुळे घरावरील पत्रे उडून गेले आहेत. कुसनाळ येथील पाच घरांचे नुकसान झाल्याची माहिती आ. श्रीमंत पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने या गावाला भेट देऊन श्रीमंत पाटील फाऊंडेशनतर्फे सर्वांना आर्थिक मदत दिली. यामध्ये श्रीमती महादेवी संगाप्पा मादर, महादेवी शरणाप्पा मादर, सुवर्णा कांबळे, नागव्वा शरणाप्पा मादर व चिदानंद कांबळे यांचा समावेश आहे. या सर्वांना धीर देताना काहीही अडचण आल्यास आपल्याशी व आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची विनंती त्यांनी या कुटुंबियांना केली. शासनाकडूनही मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी तहसीलदार राजेश बुर्ली, उपनिरीक्षक बी. एम. रबकवी, पाटबंधारे खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता प्रवीण हुनशीकट्टी, स्थानिक नेते जयपाल यरंडोले, अमित पाटील, विजय खन्नीकुडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *