Tuesday , March 3 2026
Breaking News

येळ्ळूर ग्राम पंचायतचे विविध सरकारी कार्यालयाना निवेदन सादर

Spread the love


बेळगाव : येत्या 25, 26, 27, 28 एप्रिल रोजी होत असलेल्या येळ्ळूर चांगळेश्वरी व कलमेश्वर, यात्रेसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस सीपीआय श्रीनिवास हंडा यांना तसेच विविध सरकारी कार्यालयाना येळ्ळूर ग्राम पंचायतीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.
येळ्ळूर यात्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे झाली नव्हती. यावर्षी यात्रा होत असून ती मोठ्या उत्साहात होणार असून भाविकही मोठ्या प्रमाणात येणार असून यासाठी येळ्ळूर गावात सालाबादप्रमाणे चोक पोलीस बंदोबस्त करून शांततेत यात्रा पार पाडण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच केएसआरटीसी डेपो मॅनेजर श्री. गुप्पीकर यांना यात्रेत जास्तीजास्त बसेस सोडून भाविकांची सोय करावी, असे निवेदन देण्यात आले व हेस्कॉमचे ग्रामीण युनिट असिस्टंट इंजिनिअर प्रशांत टिपगी यांना यात्रा काळात अखंडित वीज पुरवठा करावा, असे निवेदन दिले.
यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य शिवाजी नांदूरकर, प्रमोद पाटील, परशराम परीट, रमेश मेणसे, राजू डोंन्यांनावर हे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *