Wednesday , March 4 2026
Breaking News

रोटरी ई -क्लबचा 24 रोजी आर्ट उत्सव

Spread the love

बेळगाव : रोटरी ई -क्लब बेळगाव यांच्यातर्फे जी.एस.एस. कॉलेज, गुलमोहर बाग (कलाकार संघ) आणि तरुण भारत ट्रस्ट यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आर्ट उत्सव अर्थात कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळकवाडी येथील जी.एस.एस. व आर.पी.डी. कॉलेज आवारामध्ये या कला उत्सवाचे आयोजन केले जाणार असून नोंदणी प्रक्रिया सकाळी 8:30 वाजता सुरू होणार आहे. या उत्सवात आपल्या कलांच्या माध्यमातून सामाजिक योगदान देणाऱ्या विविध कलाकाराकडून त्यांच्या कला सादर केल्या जाणार आहेत.
त्याचप्रमाणे यावेळी बेळगाव शहरातील ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार समारंभ होईल. कला उत्सवाची सांगता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. कला उत्सवानिमित्त सर्वांसाठी विविध गटांमध्ये चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.
चित्रकला स्पर्धेचे गट आणि विषय पुढीलप्रमाणे आहेत. गट 1 -इयत्ता पहिली ते चौथी, विषय : माझा आवडता प्राणी. गट 2 -इयत्ता पाचवी ते सातवी, विषय : माझा आवडता खेळ, गट 3 -इयत्ता आठवी ते दहावी, विषय : माझ्या स्वप्नांचे विश्व. गट 4 -खुला गट, विषय : तंत्रज्ञानाचे गुलाम. गट 5 -आजोबा आजी आणि नातवंडांचा गट,
विषय : कुटुंब. या गटामध्ये आजोबा-आजी आणि त्यांचे एक नातवंड भाग घेऊ शकते. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी 7892352632 अथवा 9845903559 किंवा https://bit.ly/3EvPk52 ही लिंक वापरून अर्ज करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *