Thursday , December 11 2025
Breaking News

हुतात्म्यांच्या वारसांना श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून मदत

Spread the love


बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या आजारी पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुंबईच्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना प्रकृती खालावल्यामुळे केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मी बेन्नाळकर यांची पेन्शन देखील गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे बेन्नाळकर यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतची माहिती मिळताच महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना 50 हजार रुपयांची मदत देऊ केली. मंत्री शिंदे यांचे सहाय्यक आणि मुंबईतील शिवसेनेचे आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज गुरुवारी केएलई हॉस्पिटलला भेट देऊन लक्ष्मीताई बेन्नाळकर यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावरील उपचारासाठी बेन्नाळकर कुटुंबियांकडे 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
याप्रसंगी मारुती बेन्नाळकर यांची कन्या इंदुमती, नातू जितेश मेणसे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, अरविंद नागनुरी, म. ए. समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, शिवसेनेचे दिलीप बैलुरकर, राजकुमार बोकडे, आर. आय. पाटील, किसन सुंठकर आदींसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गोव्याच्या शेकोटी साहित्य संमेलनात बेळगावचे पत्रकार, कवी आमंत्रित

Spread the love  बेळगाव – गोव्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दि. 13 व 14 डिसेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *