
बेळगाव : बेळगावातील एपीएमसी पोलीस ठाण्याला मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी शुक्रवारी अचानक घेराव घालून पोलिसांच्या उपद्रवाचा निषेध केला.
काळ, गुरुवारी रात्री काही पोलिसांनी आझमनगर मुख्य रस्त्यावर दादागिरी करत उर्मटपणे अश्लील शिवीगाळ करत छोटीछोटी दुकाने बंद करायला भाग पाडले. समाजसेवक इम्रान फत्तेखान यांनी त्याचा जाब विचारल्यावर त्यांनाही पोलिसांनी शिवीगाळ केली. या घटनेच्या निषेधार्थ आज शुक्रवारची नमाज संपल्यानंतर आझमनगर जमातीच्या नेत्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्याला घेराव घालून निदर्शने केली.
यावेळी पीएसआय मंजुनाथ यांच्याशी चर्चा करताना झाक्रिया मशिदीचे अध्यक्ष अक्सर बागवान यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक बाबतीत पोलिसांना सहकार्य करत आलो आहोत. सध्या आमचा रमजान सण सुरु असून काही पोलीस आम्हाला येऊन उपद्रव करत आहेत. त्याशिवाय त्यांनी अर्वाच्च शब्दांत शिवीगाळही केली आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ही निदर्शने मागे घेण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta