Wednesday , March 4 2026
Breaking News

शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्‍यांनी केली पाहणी

Spread the love

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वर जयंती आणि रमजान तिन्ही एकाचवेळी आल्याने बेळगाव पोलिसांनी काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. बेळगावात आज शिवजयंती मिरवणूक मार्गाची पोलीस अधिकार्‍यांनी पाहणी केली.

बेळगावात शिवजयंती उत्सवासाठी क्षणगणना सुरु झाली आहे. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या अधिपत्याखाली शिवजयंतीच्या चित्ररथ मिरवणुकीची तयारी आतापासूनच उत्सव मंडळांनी सुरु केली आहे. बेळगावच्या शिवजयंतीला व त्यानिमित्त निघणार्‍या चित्ररथ मिरवणुकीला भव्य परंपरा आहे. 100हुन अधिक मंडळे या मिरवणुकीत सजीव देखाव्यांसह आपले चित्ररथ सादर करतात. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी ही मिरवणूक पाहण्यासाठी केवळ बेळगाव शहरच नव्हे तर, बेळगाव तालुका, जिल्हा, परजिल्हे तसेच गोवा आणि महाराष्ट्रातील चंदगड, आजरा आदी भागातून लोक मोठ्या संख्येने येतात. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या पारंपरिक मार्गाची शुक्रवारी डीसीपी रवींद्र गडादी यांनी पोलीस अधिकारी आणि महामंडळ पदाधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. या पाहणीवेळी एसीपी चंद्रप्पा, एसीपी सदाशिव कट्टीमनी, सीपीआय दिलीप निंबाळकर, शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *