
बेळगाव : कॅम्पमधील रहदारी पोलीस स्थानकात आज शांतीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत 4 मे रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीमध्ये विनाकारण डॉल्बीचा आवाज मोठा ठेवू नये अशी सूचना करण्यात आली.
त्याचबरोबर चित्ररथ मिरवणूक लवकरात लवकर आणि शांततेत संपवावे, असे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या उपस्थितीत साधारण शांती सभा पार पडली.
यावेळी शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी यांनी देखील चित्ररथ मिरवणुक मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांना योग्य उपाययोजना करण्यास सांगितले. यावेळी शिवजयंती उत्सव महामंडळाचे सदस्य पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta