
बेळगाव : स्वदेशी गोमाता संरक्षण, संवर्धन आणि गौ आधारित रोजगार निर्माण हे उद्देश्य घेऊन बनशंकरी गौ अनुसंधान केंद्र, कौजलगी येथे कार्यरत आहे. गोमयापासून विविध वस्तू निर्माण अंतर्गत गोमय राखी आम्ही आपणापर्यंत घेऊन आलो आहोत.
गोसंरक्षण, गोसंवर्धन हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. त्या अंतर्गतच हा छोटासा प्रयत्न. ही केवळ गोमय राखीच नव्हे, तर तो संकल्पही आहे. गोसेवेचा, गोमातेप्रति आदर दर्शविण्याचा… केवळ ही राखीच नव्हे तर हे आहे गासूत्रबंधन.
कौजलगी येथे केशवस्मृती ट्रस्ट व सावयव कृषी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बनशंकरी गोसंवर्धन व अनुसंधान केंद्र हा प्रकल्प साकारला जात आहे. एकात्मिक जैविक शेती, गोमयापासून विविध वस्तू निर्माण, पंचगव्य आणि आयुर्वेद, अपारंपारिक उर्जास्रोत विकास, स्वदेशी गोवंश संवर्धन आणि संरक्षण ही पंचसूत्री या प्रकल्पाचे उद्देश आहेत.
या अंतर्गतच गोमयापासून राखी निर्मिती केली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पुण्यकर्मात आपले मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे.
‘वीरवाणी’ कार्यालय तसेच किशोर निखार्गे (मो.8618814976) येथे या राख्या विक्रीस उपलब्ध आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta