Wednesday , March 4 2026
Breaking News

कारच्या धडकेत कल्लेहोळचा वृद्ध जागीच ठार

Spread the love


बेळगाव : भरधाव कारच्या धडकेत शंकर बाळू यादव (वय ६०, रा. कल्लेहोळ ता. जि. बेळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी बेळगाव- वेंगुर्ला रस्त्यावरील तांबूळवाडी फाटा आणि ताम्रपर्णी नदीवरील पुलानजीक घडला.
गवसे (ता. चंदगड) येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभाला शंकर यादव गेले होते. लग्न उरकून ते कल्लेहोळ गावी आपल्या दुचाकीवरुन जात होते. यावेळी बेळगावहून चंदगडच्या दिशेने गजेंद्र बाळाप्पा मुकप्पापोळ (रा. सिद्धीहोळी ता. गोकाक, जि. बेळगाव) हे भरधाव कारने जात होते. त्यांच्या कारने यादव यांच्या स्कुटीला जोराची धडक बसली. यादव यांना सुमारे दीडशे फूट फरफटत नेले. कार उंचावरून शेतात पलटी झाली. सुदैवाने एअर बॅग ओपन झाल्याने गजेंद्र बचावले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *