
आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून प्रयत्न : रस्ता कामास प्रारंभ
संबरगी : गेल्या अनेक दिवसांची मागणी असलेल्या गुंडेवाडी-चमकेरी रस्ताकामाचा नुकताच प्रारंभ झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन याचे उद्घाटन झाले.
सदरचा रस्ता बराच खचला होता. त्यामुळे येथून ये-जा करणार्या जनतेची अडचण होत होती. याचा विचार करून आ. श्रीमंत पाटील यांनी 25 लाखांचा विशेष निधी यासाठी मंजूर करून घेतला. त्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला. यावेळी आ. पाटील म्हणाले, ग्रामीण भागाला जोडणार्या सर्व रस्त्यांचा विकास व्हावा, ही आपली पूर्वीपासूनची इच्छा आहे. रस्ते जोडले तर संपर्क वाढेल, तो वाढला तर दळणवळण वाढणार आहे, साहजिकच याचा रोजगार व व्यापारावर परिणाम होऊन ग्रामीण भागाचा विकास होत असतो. त्यामुळे ग्रामीण रस्ते तालुक्याला जोडण्यासाठी आपला यापुढेही सातत्याने प्रयत्न राहील.
अनेक दिवसांची मागणी असलेला हा रस्ता सुरू झाल्याने येथील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी स्थानिक नागरिक शिवानंद गोलभावी, सिद्राय तेली, आबासाब चव्हाण, आप्पाण्णा मजगावकर, रामगौडा पाटील, कलगौडा पाटील, एम. डी. जाधव, संभा वीर, पापाचंद बनजवाड, विकी कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta