
अथणी : उगार बुद्रूक येथील ग्रामदेवता पद्मावती मंदिरात नुकतीच महामंगल आराधना महोत्सवाला सुरवात झाली. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी सहभाग घेऊन देवीचे दर्शन व महास्वामींचा आशिर्वाद घेतला.
हा आराधना महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. या महोत्सवात श्रीक्षेत्र सोंदा मठाचे जगद्गुरू अकलंकेसरी स्वस्तिश्री भट्टाकलंक भट्टारक स्वामी, श्रीक्षेत्र कंबदहळ्ळी मठाचे भानुकिर्ती भट्टारक स्वामी, अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष व महोत्सवाचे संयोजक शीतलगौडा पाटील, उगार बीके ग्रा. पं. अध्यक्ष भुजगौडा पाटील, प्रतिष्ठीत नागरिक मनोज कुसनाळे, आप्पासाब चौगुला, जयपाल यरंडोले, वृषभ पाटील, विजय शिंदे, दिपक नंदगाव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta