Wednesday , December 10 2025
Breaking News

गुरुवंदना कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाचे श्री भगवानगिरी महाराजांना, निपाणी सरकाराना निमंत्रण

Spread the love


बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावच्या सदस्यांनी काल रविवारी कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील मराठा समाजाच्या रामनाथगिरी (समाधी) मठाचे मठाधिपती जगतगुरु राष्ट्रीय धर्माचार्य श्री श्री भगवानगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्याद्वारे त्यांना ‘गुरुवंदना’ कार्यक्रमासाठी निमंत्रित केले.
श्री श्री भगवानगिरी महाराज यांना हल्लीच काशी धर्म पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, स्वामी नारायणनंद सरस्वती, सुमेरू मठाचे जगद्गुरू शंकराचार्य, परमपूज्य नरेंद्रनंदजी सरस्वती, परमपूज्य नामदेव महाराज हरड यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय धर्माचार्य म्हणून घोषित करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या धर्मसभेत ही पदवी भगवानगिरी महाराजांना देण्यात आली. याच समारंभात महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच परमपूज्य जगतगुरु राष्ट्रीय धर्माचार्य श्री श्री भगवानगीरी महाराज यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत भाषा प्रसारासाठी तज्ञ सल्लागार तथा मुख्य प्रवर्तक म्हणून निवड करण्यात आली आहे.
सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने येत्या दि. 15 मे 2022 रोजी होऊ घातलेल्या ‘गुरुवंदना’ कार्यक्रमासाठी महाराजांना निमंत्रीत करण्यात आले. यावेळी मठाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक प्रकाश तेलवेकर यांनी मठाच्या इतिहास व कार्याची माहिती दिली. या छोटेखानी कार्यक्रमाला नूल येथील युवा कार्यकर्ते अमरनाथ तेलवेकर यांच्यासह सकल मराठा समाजाचे सदस्य -साहित्यिक गुणवंत पाटील, महादेव पाटील, श्रीमंत दिलीपराव रायजादे (सरकार), श्रीमंत रमेशराव रायजादे (सरकार), विक्रम गायकवाड, धडाडीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील, राहुल मुचंडी, विशाल कंग्राळकर, उदय पाटील, पवन म्यागोटे आदी उपस्थितीत होते.


‘गुरुवंदना’साठी निप्पाणीकर सरकारांना निमंत्रण
सकल मराठा समाज बेळगावतर्फे कांही सदस्यांनी निप्पाणीचे संस्थानिक आणि राजे सिधोजीराजे यांचे थेट वंशज राजे श्रीमंत दादाराजे नाईक निंबाळकर सरलष्कर (निप्पाणीकर सरकार) व राणीसाहेब श्रीमंत सौं. साम्राज्यलक्ष्मीराजे नाईक निंबाळकर (निप्पाणीकर सरकार) यांची निप्पाणी येथे भेट घेऊन त्यांना ‘गुरुवंदना’ कार्यक्रमासाठी निमंत्रित केले.
श्रीमंत दादाराजे यांच्या हल्लीच झालेल्या वाढदिवसानिमित्त व त्यांची सरकार नियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सकल मराठा समाजाच्यावतिने त्यांचा निप्पाणी येथील राजवाड्यामध्ये पुष्पहार व शाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सकल मराठा समाज बेळगावच्या कार्या विषय माहिती जाणून घेतली. तसेच समाजाची उन्नती आणि प्रगती कशी करता येईल, या विषयी चर्चा व मार्गदर्शन केले.
यावेळी निप्पाणीकर सरकारांना सपत्नीक बेळगाव येथे 15 मे 2022 रोजी होऊ घातलेल्या ‘गुरुवंदना’ कार्यक्रमासाठी निमंत्रीत करण्यात आले. याप्रसंगी निप्पाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, सकल मराठा समाजाचे सदस्य -साहित्यिक गुणवंत पाटील, महादेव पाटील, श्रीमंत दिलीपराव रायजादे (सरकार), श्रीमंत रमेशराव रायजादे (सरकार), विक्रम गायकवाड, सागर पाटील, राहुल मुचंडी, विशाल कंग्राळकर, उदय पाटील, पवन म्यागोटे आदी उपस्थितीत होते.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *