
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा खून झाला असावा अशी शंका आहे.
खून झालेल्या अवस्थेतील अज्ञाताचा मृतदेह आढळून आल्याने येळ्ळूर गावात एकच खळबळ उडाली आहे. कोणीतरी त्याचा खून करून मृतदेह गावात टाकून दिला अशी चर्चा आहे. काल रात्री ही घटना घडल्याचा कयास आहे. याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीनिवास यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न ग्रामीण पोलीस करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta