
मुंबई : बेळगांव जिल्ह्यातील मराठी पत्रकारांच्या समस्यांबाबत बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापुरकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, चंदगडचे आमदार राजेश पाटील, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून चर्चा केली.
यावेळी बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले की, सीमाभागातील शाळांना मंजूर झालेले अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्यात येईल.
सीमाभागातील पत्रकारांच्या तसेच अन्य समस्यांबाबत विचार करण्याचे व सहकार्याचे आश्वासन आ. राजेश पाटील व आ. प्रकाश आबिटकर यांनी दिले. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य सदानंद सामंत, सुहास हुद्दार, विलास अध्यापक व अन्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta