Tuesday , March 3 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने पुस्तक दिन कार्यक्रम संपन्न

Spread the love


बेळगाव : बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक दिना निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत वाचनालयाचा सातत्याने लाभ घेणाऱ्या वाचकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून त्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले.

सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर गोविंदराव राऊत, वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर आणि मानद कार्यवाह रघुनाथ बांडगी उपस्थित होते.

या कार्यक्रमात वाचकांचे प्रतिनिधी म्हणून प्रकाश पिराळे, रमेश बाजीकर, दिवाकर देशपांडे, कृष्णा गरडे, चंद्रकांत घवाळी, प्रदीप सिद्दण्णावर आणि सौ. अलका सुभाष सडेकर यांचा गुलाब पुष्प आणि पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

या वाचक प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रंथ आपले गुरु आहेत. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होऊन जगाचे ज्ञान होते. तणाव कमी होण्याबरोबरच मनाला शांतता लाभते. सार्वजनिक वाचनालयाची इमारत भव्य, सुंदर आणि शांत असल्याने इथे वाचनाचा आनंद पुरेपूर मिळतो, असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी वाचनालयाचे संचालक सुनीता मोहिते, ॲड. ईश्वर मुचंडी, अभय याळगी, अनंत जांगळे, अनंत लाड, प्रा. विनोद गायकवाड यांच्यासह वाचकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Spread the love  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *