
बेळगाव : मल्टीविस्टा या चेन्नईस्थित कंपनीने विशेषत: ऑटोमेशन मशिनरी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने बेळगाव येथील शांताई वृध्दाश्रमाला ५१००० रुपयांची देणगी दिली आहे.
कंपनीच्या प्रतिनिधींनी माजी महापौर विजय मोरे, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व शांताईचे कार्याध्यक्ष यांना धनादेश सुपूर्द केला. यावेळी संचालक संतोष ममदापुरे, ऍलन मोरे उपस्थित होते.
आज मल्टीविस्टा कंपनीने क्लब रोड बेळगाव येथील हॉटेल इफा येथे प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कंपनीने आपल्या CSR उपक्रमातून ही देणगी दिली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही नेहमी चांगल्या कामासाठी प्रेरणा देतो. वृद्धांची काळजी घेण्याच्या क्षेत्रात शांताई चांगले काम करत आहेत. आम्हाला काम माहीत आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत, असे सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी कंपनीचे आभार मानले व बेळगावातील उद्योगपतींनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केले.
Belgaum Varta Belgaum Varta