
बेळगाव : प्रसिद्ध उद्योजक आणि स्टार एअरलाइन्सचे संस्थापक संजय घोडावत यांनी स्टार एअरलाइन्सतर्फे मान्यताप्राप्त पत्रकारांसाठी हवाई प्रवासात २०% सवलत देण्याची महत्वाची घोषणा केली आहे.
बेळगावात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्टार एअरलाइन्सचे संस्थापक आणि घोडावत उद्योग समूहाचे प्रमुख संजय घोडावत यांनी सांगितले की, कर्नाटकात राहणाऱ्या ऍक्रिडेशन कार्ड असलेल्या सर्व मान्यताप्राप्त पत्रकारांना कर्नाटकांतर्गत हवाई प्रवासासाठी तिकीट दरात स्टार एअरलाइन्सतर्फे २०% सवलत देण्यात येणार आहे. श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरंदवाडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी संजय घोडावत यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याची दखल घेत घोडावत यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. कर्नाटकात राहणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त पत्रकारांना कर्नाटकांतर्गत प्रवासासाठी ही सवलत मिळणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta