
बेळगाव : भाजपा सरकार करत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि सरकारने वाढवलेल्या महागाईविरुद्ध आज युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
प्रारंभी संचयनी सर्कल येथील हनुमानच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा विरोध केला. तसेच ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या केल्याप्रकरणी 40% कमिशन मागितलेले मंत्री ईश्वराप्पा यांना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.
यासोबतच सरकारने जी भरमसाठ वाढ केली आहे त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागले असून ही दरवाढ देखील ताबडतोब थांबवावे आणि सामान्य नागरिकांना परवडतील अशी दर ठेवावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, युवा नेते राहुल जारकीहोळी, मृणाल हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेस युवक नेते मोठ्या संख्येने या काढण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta