
बेळगाव : रेल्वे विभागाने रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे पहिले रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ३८३) चोविस तासांसाठी बंद राहणार आहे. रविवारी (ता. १) सकाळी ८ ते सोमवारी (ता. २) सकाळी ८ पर्यंत हे गेट बंद राहील.

यासंबंधी शहर पोलीस आयुक्त कार्यालयातून परवानगी घेण्यात आली आहे. सदरील २४ तासांच्या काळासाठी वाहनचालक, सायकलचालक, पादचाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे हुबळी रेल्वे प्रशाननाने कळविले आहे.
यापूर्वी रेल्वेमार्ग दुपदरीकरण कामासाठी २९ एप्रिल रोजी सकाळी ८ पासून ३० एप्रिल रोजी सकाळी ८ पर्यंत तानाजी गल्ली व फुलबाग गल्लीनजीक गेट (लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ३८६) बंद ठेवण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta