Friday , October 18 2024
Breaking News

शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला, बेळगावात शिवमुर्ती आगमनाचा सोहळा जल्लोषात

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात उद्या सोमवारपासून तीन दिवस पारंपारिक शिवजयंती उत्सवाचा जल्लोष सुरू होणार आहे. दरम्यान शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज रविवारी सायंकाळी शहर उपनगरातील विविध मंडळांच्या वतीने शिवमूर्ती आगमनाचा सोहळा जल्लोषात सुरू झालेला पाहायला मिळाला. पारंपारिक वाद्यांचा गजर,जय भवानी जय शिवाजी जय घोषणेमुळे शहर दुमदुमून गेले.

उद्या सोमवारपासून बेळगावच्या तीनदिवसीय पारंपारिक शिवजयंती सोहळ्याला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी सायंकाळी येथील छत्रपती शिवाजी उद्यानात विविध मंडळांच्यावतीने श्री शिवमूर्ती आगमन सोहळ्याचा थाटात शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवमूर्तीची पूजा केली. फटाक्यांची आतिषबाजी ढोल-ताशांचा गजर आकर्षक विद्युत रोषणाई आणि डॉल्बीच्या दणदणाटात विविध मंडळांनी ची मूर्ती आगमन सोहळ्याचे मिरवणूक काढली. शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील चर्मकार समाज सुधारणा युवक मंडळाच्यावतीने या वर्षी नव्याने बनवण्यात आलेल्या शिवमुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला मिरवणुकीत उपस्थित होत्या.

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे उद्या सोमवारी सकाळी सात वाजता धर्मवीर संभाजी चौकात विविध मंडळांकडून आणल्या जाणाऱ्या शिवज्योतींचे स्वागत केले जाणार आहे.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष शहर आणि परिसरात साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली होती. यंदा कोरोना निर्बंध नसल्यामुळे शिवजयंती उत्सव मंडळांनी महिन्यापासूनच शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. जिवंत देखावे सादर करण्यासाठी रात्रीचा सराव सुरू आहे. अनेक मंडळाचे कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवर रवाना झाले आहेत.

मध्यवर्ती उत्सव मंडळातर्फे उद्या सकाळी सातपासून शिवज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. नऊ वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन होणार आहे. दहा वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात मध्यवर्ती उत्सव मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे पूजन करून चित्ररथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.


बेळगाव उपनगर परिसरातही शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त वडगाव विभागात तीन मे रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारी दिनांक 3 रोजी सायंकाळी सात वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्यावतीने बुधवार दिनांक 4 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता बॅरिस्टर नाथ पै चौक येथे चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन होणार आहे. उद्या सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *