Friday , October 18 2024
Breaking News

माळी गल्ली येथे शिवजन्मोत्सव उत्साहात

Spread the love


बेळगाव : बेळगाव शहरातील माळी गल्ली येथील युवक मंडळातर्फे आज सोमवारी छ. शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

माळी गल्ली येथे आयोजित या शिवजन्मोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नूतन नगरसेविका ज्योती राजू कडोलकर या उपस्थित होत्या. नगरसेविका कडोलकर यांच्या हस्ते पूजा विधी करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी पाळणा म्हंटला. जन्मोत्सव कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांचा मंडळातर्फे शाल -श्रीफळ आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास अनुराधा चौगुले, कल्पना ठोकणेकर, माजी नगरसेवक मेघन लंगरकांडे, प्रभाकर बामणेकर, विकी ठोकणेकर, बसवराज नेसर्गी, रोहित लंगरकांडे आदींसह माळी गल्ली युवक मंडळाचे मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, शिवप्रेमी आणि गल्लीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *