
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या दक्षिण विभाग संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आज शिवजयंती निमित्त गोवावेस येथील प्रियंका हॉटेल समोर थाटात संपन्न झाला. कार्यालयाचे उद्घाटन मराठा जागृती निर्माण संघाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांच्या हस्ते करण्यात आले. तर डॉ. मिलिंद हलगेकर यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले.

यावेळी महादेव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव, रमेश गोरल, रमाकांत कोंडुस्कर, डॉ. मिलिंद हलगेकर, गोपाळ बिर्जे आदींनी 15 मे रोजी आयोजित गुरुवंदना कार्यक्रम यशस्वी करण्यासंदर्भात बेळगावातील मराठा समाजाला आवाहन केले.
यावेळी रमेश रायजादे, दत्ता जाधव, सागर पाटील, एम. आर. पाटील, उदय पाटील, विजय हांडे, विशाल कंग्राळकर, पवन मायगोटी, राहुल मुचंडी, संतोष बोकडे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta