
बेळगाव : होनिंहाळ येथे महालक्ष्मी देवीच्या गदगेची वास्तुशांती, पडल्या भरणी कार्यक्रम आणि महाप्रसाद असा संयुक्त कार्यक्रम गावातील पंच कमिटी, देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी अबालवृद्धांनी भाग घेऊन यशस्वी केला. सुरुवातीला महालक्ष्मी देवस्थानमध्ये गार्हाणे घालण्यात आले, त्यानंतर मिरवणुकीने गदगे स्थळाकडे ग्रामस्थांनी जाऊन पूजन करण्यात आले. यानिमित्त गावांमध्ये प्रत्येकाने आपल्या दारामध्ये रांगोळी, अलंकार केला होता, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील वडील मंडळीनी परिश्रम घेतले. महालक्ष्मी देवस्थान पंच कमिटीचे सन्मानीय अध्यक्ष चंद्रकांत जाधव, धनंजय जाधव, चंद्रकांत केंगेरी, महादेव तळवार, गजानन जाधव, शहाजी जाधव, गुंडू तळवार, बसवंत केंगेरी, प्रकाश कड्यागोड, गणपती सुळगेकर, लक्ष्मण मलामगोळ, भर्मा कटबुगोळ, रवी मठद, चेन्नया मठद, महादेव केंगेरी, मारुती व्हरकेरी, बाळू बळवडी, दानय्य गिरमलनावर, ईरया मठद, विजय जाधव, रायप्पा केंगेरी आदि उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta