Saturday , October 19 2024
Breaking News

बसव जयंतीनिमित्त आमदार अनिल बेनके यांच्याकडून पूजन

Spread the love


बेळगांव : आज दि. 03 मे 2022 रोजी बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके यांनी शहरात बसव जयंती निमित्त जिल्हा प्रशासन, अखिल भारत वीरशैव महासभा आणि विविध लिंगायत संघटना यांनी बसवेश्वर सर्कलमध्ये विश्वगुरु बसवण्णा यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण केले.
या संदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, अखिल भारत वीरशैव महासभा जिल्हा महिला घटकच्या अध्यक्षा श्रीमती रत्नप्रभा बेल्लद आणि इतर लिंगायत संघटना व बसवादी प्रमुख, भक्त या सर्वांनी पुष्पहार अर्पण करुन बसव जयंती साजरी केली.
त्यानंतर बेळगांव कोर्ट आवारामध्ये बेळगांव बार असोसिएशन वतीने विश्वगुरु बसवण्णा जयंतीमध्ये भाग घेवुन बसवेश्वरांच्या फोटोचे पुजन केले.
या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, सर्वप्रथम सर्वांना बसव जयंतीच्या शुभेच्छा, गेल्या दोन-तीन वर्षापासून कोविड आणि विविध अडचणींमुळे बसव जयंती उत्साहाने साजरी केली नाही त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात बसव जयंती साजरी करण्यात येत आहे.
या संदर्भात आमदारांसमवेत बेळगांव बार असोसिएशन अध्यक्ष प्रभु यत्नट्टी, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर चव्हाण, बार असोसिएशनचे सर्व सदस्य व वकील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *