Thursday , December 11 2025
Breaking News

शिवभक्तांनी स्थापन केली घरावर शिवरायांची मूर्ती

Spread the love


बेळगाव : शिवरायांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या अनेक शिवभक्तांची उदाहरणे आपण पहात आलो आहोत. तनामनात स्फूर्ती आणि शिवरायांच्या भक्तीने संचारलेल्या बेळगावमधील शिवभक्तांनी आपल्या घरावर शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. काल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तसेच परंपरेप्रमाणे साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर नगर गाडेमार्ग, वडगाव येथील भूषण रमेश पाटील आणि संदीप रमेश पाटील या दोन्ही भावंडांनी शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना गगनचुंबी इमारतीवर केली आहे. परिसरातील पंच आणि मान्यवर तसेच शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवमूर्तीचे अनावरण करण्यात आले. सदर शिवमुर्ती आसपास परिसरातून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरूनही सहजपणे दिसू शकेल इतक्या उंचीवर या शिवमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
शिवभक्तीने भारलेल्या या दोन्ही भावंडांनी शिवरायांप्रती असलेला आदर अशा अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्याने सर्व शिवभक्तातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

“मराठी” संदर्भात अल्पसंख्यांक आयुक्तांचे कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवाना पत्र

Spread the love  बेळगाव : बेळगावमधील मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करावे तसेच भाषिक अल्पसंख्यांक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *