Tuesday , December 9 2025
Breaking News

अखिल भारतीय साहित्य परिषद संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सीमाकवी रविंद्र पाटील

Spread the love

सीमाभागात माय मराठीचा जागर करणारा अवलिया : रवींद्र पाटील

बेळगाव : ८ मे रोजी अखिल भारतीय साहित्य परिषदचे तिसरे संमेलन बेळगाव येथील मराठा मंदिर येथे पार पडत आहे.

रविंद्र पाटील सर सध्या मराठी विषयाचे सहा. शिक्षक म्हणून राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय शिनोळी बु. ता. चंदगड जि. कोल्हापूर येथे २० वर्षे कार्यरत आहेत. त्यांचे गाव बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी. गावात गेली २० वर्षे ते ग्रामीण साहित्य संमेलनाची साहित्य पंढरी उभी केली आहे. सीमाभागात मराठीची होणारी गळचेपीचा उद्रेक त्यांनी थेट बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या काव्यमैफिलीत ‘लढा’ या कवितेतून अन्याय मांडून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच व्यासपीठावर त्यांना सीमाकवी म्हणून जाहीर केले. हाती घेतलेल्या कामात स्वतःला झोकून देणे हा त्यांचा स्वभाव.

त्यामूळेच त्यांच्याकडे अनेक पदे चालून आली आहेत. ते सध्या
*राज्याध्यक्ष – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्य*
*जिल्हाध्यक्ष*- आविष्कार फौंडेशन भारत बेळगाव शाखा
*तालुका समन्वयक – चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ*
*कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष -नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र*
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आजतागायत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचा
*कोजिम प्रेरणा पुरस्कार* सन्मानीत आहेत .
*दै. जनमतचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०१९*
*राजा शिवछत्रपती पारगड – चंदगड सन्मान – २०१९*
*काव्य कला गौरव पुरस्कार, पुणे -२o१८*
*आदर्श पत्रकार पुरस्कार , सासवड पुणे – २०१९*
*आविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार – २०२०*
*बेळगाव केएलई वेणुध्वनी एफ . एम. रेडिओ केंद्रावर तीन वेळा मुलाखत व कार्यक्रमात सहभाग*
*सीमाकवी, पत्रकार, तंत्रस्नेही शिक्षक , समालोचक ,निवेदक तसेच सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात कार्यरत*

*चंदगड तालुका मराठी अद्यापक संघाकडून हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, उखाणे स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, सामान्य तसेच ऑनलाईन गुगलमीट मार्ग दर्शन , चर्चासत्र यांचे नेटके नियोजन करण्यात सरांचा हातखंडा आहे*.

रवि पाटील स्वतः तंत्रस्नेही असून आपल्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून बेळगाव येथे दोन दिवसांचे तंत्रस्नेही शिबीर यशस्वीपणे भरविले.
८ मे रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनात आमदार नाना पटोले, संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष रविंद्र पाटील, कवी संमेलनाध्यक्ष शिवाजी शिंदे, उद्घाटक आप्पासाहेब गुरव, शिवसंत संजय मोरे, ॲड.सुधीर चव्हाण यांच्या उपस्थित हा संमेलनाचा सोहळा पार पडणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *