Monday , September 21 2026
Breaking News

रविवारी रंगणार तिसरे साहित्य संमेलन

Spread the love

श्रीपाल सबनीस यांच्या विचारांची मिळणार मेजवानी

बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दोन सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या सत्रात कवी संमेलन होणार आहे. याचे अध्यक्षपदी पत्रकार व कवी शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

संमेलनाचे उद्घाटक मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार आहे.

या अगोदर ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, श्रीराम पचिंद्रे यांनी संमेलनाध्यक्षपद भूषिवले आहे. उदघाटन सोहळा, अध्यक्षीय भाषण, कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.
संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस हे चिकित्सक लेखक, अभ्यासक, संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत.
ज्ञानेश्वर ते आंबेडकर, संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित, आदिवासी प्रतिभावंताचे साहित्य, छत्रपती शिवाजीराजे आणि ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद विवेकवादी भूमिका, उपेक्षितांची पहाट, संचिताची चांदणवेल, मुक्तक, सेक्युलरिझम व संत साहित्य, इहवादी संस्कृती शोध, संतत्व व देवत्वाचा शोध, इतिहास, संशोधनात्मक ग्रंथ, ललित लेखन, वगनाट्य, चरित्रलेखन, अशा एकूण 83 ग्रंथाचे विपुल लेखन त्यांनी केले आहे, पिंपरी येथे संपन्न झालेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषिवले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *