Saturday , June 13 2026
Breaking News

खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची तयारी जोरात

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या दि. 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.
यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार यंत्रणा चालवलेली आहे. तसेच खानापूर रिक्षा असोषेशन च्या कार्य कर्त्यांनी आपापल्या रिक्षावार परम पूज्य श्री. श्री. श्री. मंजुनाथ स्वामी यांच्या फोटोचे अनावरण केले. तत्पूर्वी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा नारळ फोडला. याप्रसंगी बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिलीपदादा पवार, सचिव श्री. रमेश पाटील, उपाध्यक्ष श्री. सीताराम बेडरे सर, शहर अध्यक्ष श्री. अप्पया गुरव (हरिबोल), कार्याध्यक्ष श्री. अमृत पाटील, श्री. व्हन्नापा (बाबू), शिमनगौडर देवलत्ती, अध्यक्ष पूर्व विभाग श्रीपाद जोशीलकर तळवडे, श्री. मारुती सीमन गौडर, शुभम पाटील झाडनावगा, श्री. प्रकाश मादार नंदगड, निरंजन बिर्जे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रिक्षा असोसिएशने आपले संपूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतातून घरी परतताना तरुणावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती स्थिर

Spread the love  कणकुंबी : तालुक्यातील कणकुंबी वनक्षेत्रातील हुळंद गावाबाहेर बुधवारी संध्याकाळी शेतकाम आटोपून घरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *