Monday , December 8 2025
Breaking News

नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पदभार स्वीकारला

Spread the love

बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.मावळते जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आपणाकडील पदभार नितेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे. एम.जी. हिरेमठ यांची सरकारने बेंगळुरूला व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे.

नवीन जिल्हाधिकाऱ्यांचा परिचय:

नितेश पाटील मूळ : विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील केरुतगी गावचे आहेत. त्यांनी विजयपुरा येथे एसएसएलसीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी NUC अलाहाबाद येथे B.Sc (संगणक विज्ञान) पदवी प्राप्त केली. सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काही काळ काम केल्यानंतर 2012 मध्ये ते UPSC च्या नागरी सेवा परीक्षेत सहभागी झाले आणि भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. प्रोबेशनरी कालावधीत, त्यांनी बेल्लारी जिल्ह्यातील कूडलिगी आणि हगरीबोम्मनहल्ली तहसील आणि नंतर शिमोगा जिल्ह्यातील मरीनचे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी चित्रदुर्ग जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आणि वाणिज्य कर विभागाचे आयुक्त म्हणून काम केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *