
बेळगाव : १९९५ नंतर प्रारंभ झालेल्या विना अनुदानित शाळा महाविद्यालयाच्या प्रशासकीय मंडळाच्या वतीने शाळा-महाविद्यालयांना अनुदान मिळावे तसेच कर्मचारी वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी बेळगाव शहरात राज्यस्तरीय धरणे आंदोलन हाती घेण्यात आले. १९९५ नंतर स्थापन झालेल्या शाळा महाविद्यालयातील प्रशासकीय मंडळाला तसेच कर्मचाऱ्यांना अनुदान आणि वेतन देण्याच्या मागणीसाठी आज बेळगावमध्ये आंदोलन हाती घेण्यात आले.
यावेळी राज्य माध्यमिक सहशिक्षक संघाचे राज्य सचिव रामू घुगवाडकर बोलताना म्हणाले, १९९५ नंतर स्थापन करण्यात आलेल्या शाळा महाविद्यालयांना अनुदान नाही. तसेच शिक्षकांना वेतन नाही. यामुळे आपण सरकारकडे अनुदान आणि वेतन देण्याची मागणी करत आहोत. गेल्या २७ वर्षांपासून आमची अडचण सरकारकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे. परंतु आमच्या मागण्यांना दाद देण्यात आली नाही. आपल्या मागण्या मान्य करा किंवा आपल्याला विष द्या अशा शब्दात तीव्र प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.या आंदोलनात विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयाचे प्रशासकीय मंडळ, सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta