Saturday , October 19 2024
Breaking News

जलद कृती दलाचे बेळगावात पथसंचलन

Spread the love


बेळगाव : जलद कृती दलाच्या वतीने बेळगावात आज संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात पथसंचलन करण्यात आले. कसल्याही प्रकारचा हिंसाचार, दंगल तातडीने थांबवून संबंधित प्रदेशात कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स अर्थात जलद कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. हे निमलष्करी दल संपूर्ण देशातच अत्यंत शक्तिशाली आणि स्ट्रायकिंग फोर्स म्हणून ओळखले जाते. जलद कृती दल जिथे तैनात असते तिथे ‘परिंदा भी पैर मार नही सकता’ असे अभिमानाने म्हटले जाते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली असलेले जलद कृती दल सध्या सर्व जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे.
त्या-त्या जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांना भेटी देऊन हे दल शक्तिप्रदर्शन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्सच्या 65 जवानांच्या तुकडीने आज बेळगावला भेट देऊन पथसंचलन केले. शहरातील चन्नम्मा चौकातून सुरु झालेले हे पथसंचलन काकतीवेस रोड, खंजर गल्ली, दरबार गल्ली, खडक गल्ली, खडेबाजार रोड यश अनेक भागात काढण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शहरात कायदा-सुव्यवस्था आणि शांततेला गालबोट लावलेले खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देतानाच शहरवासीयांना धीर देण्याचे कामही आरएएफच्या या तुकडीने केले. सुमारे आठवडाभर जलद कृती दलाचा बेळगावात मुक्काम असणार आहे. या काळात बेळगाव तालुका आणि जिल्ह्यातील काही ठिकाणी जलद कृती दल भेट देऊन रूट मार्च काढणार आहे असे सांगण्यात आले.
जलद कृती दलाच्या बेळगावातील या पथ संचलनात मार्केट पोलीस स्थानकाचे सीपीआय मल्लिकार्जुन तुळसीगेरी, खडेबाजार पोलीस स्थानकाचे सीपीआय दिलीप निंबाळकर, पीएसआय सौदागर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *