Wednesday , March 4 2026
Breaking News

उन्हाळी शिबिराची सांगता; प्रशिक्षकांचा सन्मान

Spread the love

बेळगाव : महाकाली शिक्षण संस्थेचे चेअरमन विवेकराव पाटील यांनी फिनिक्स रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या 21 दिवसांच्या उन्हाळी क्रीडा शिबिराची काल रविवारी यशस्वी सांगता झाली

उन्हाळी शिबिराच्या सांगता समारंभास प्रमुख पाहुणी म्हणून बेळगावची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतुजा पवार ही उपस्थित होती. त्याचप्रमाणे व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे म्हणून दिव्यांग राष्ट्रीय टेबल टेनिसपटू मायव्वा सनींगण्णावर, केएमएफचे सभासद सुरेशगौडा पाटील, मल्लाप्पा पाटील, बेळगाव मिल्क युनियनचे संचालक जयानंद, मार्केटिंग इन्चार्ज शंकर नाईक, डेप्युटी मॅनेजर मुजाहिद पिरजादे, झेड. एम. देसाई, जयराम ए. एम., सुभाष पाटील, संतोष जोशी आदी हजर होते. प्रारंभी योग प्रशिक्षक चक्रसाली यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरार्थींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये बेंजामिन डिसिल्वा राहुल मगदूम व कुमारी लीना (सर्व फुटबॉल) रणजीत कणबरकर (अथलेटिक्स), सुनील देसाई व महांतेश गवी (क्रिकेट), डॉ शिवकुमार शेट्टी (टेबल टेनिस) आणि चक्रासन (योगा) यांचा समावेश होता.

प्रमुख पाहुण्या ऋतुजा पवार यांचे यावेळी मार्गदर्शनपर भाषण झाले. कार्यक्रमास प्राचार्य सर पूनिरसा सुभेदार, अलका पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक वर्ग, शिबिरार्थींचे पालक, हितचिंतक आणि क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *