बेळगाव : बेळगावचे माजी महापौर विजय मोरे म्हणजे सामाजिक कार्याचा एक आदर्श आहेत. त्यांचे सामाजिक काम सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे असेच आहे, असे गौरवोद्गार चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काढले.
चंदगड तालुक्यातील कुरणी येथे आज डॉ. जयवंत पाटील संचलित सावली आश्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
मागील पंचवीस वर्षे बेळगावात शांताईच्या माध्यमातून विनामूल्य सेवा देणे असो, बेवारस व्यक्तींवर अंत्यसंस्कार असोत विजय मोरे यांनी आदर्श काम केले आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला माजी राज्य मंत्री भरमु सुबराव पाटील, शिवसेना नेते संग्रामसिंह कुपेकर, गोपाळराव पाटील तसेच चंदगड तालुक्यातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta