
बेळगाव : माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरदचंद्रजी पवार यांचे बेळगावात आज जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भव्य आकाराचा पुष्पहार घालून, फटाक्यांच्या आतषबाजीत पवार यांचे स्वागत केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विविध कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी बेळगावात आज, बुधवारी आगमन झाले. यावेळी शहरातील चन्नम्मा चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात चक्क जेसीबीच्या सहाय्याने केसरी, पांढर्या आणि हिरव्या अशा राष्ट्रध्वजाच्या रंगांच्या फुलांचा भव्य पुष्पहार त्यांना घालण्यात आला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. शरद पवार यांनीही कार्यकर्त्यांच्या या स्वागताचा विनम्रपणे स्वीकार केला.
शरद पवार यांचे चन्नम्मा चौकात आगमन होताच कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta