माजी महापौर सरिता पाटील यांची शरद पवार यांच्याकडे मागणी
बेळगाव : माजी महापौर सरिता पाटील यांनी आज बुधवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. बेळगावसह सीमाभागातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजसाठी असलेला कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी सरिता पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
95 साली सीमाभागातील लोकांसाठी सात जागा मेडिकल अंतर्गत राखीव ठेवलेल्या आहेत. आता लोकसंख्या वाढलेली आहे. मेडिकल कॉलेजची संख्याही वाढलेली आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या सोयीचा लाभ मिळावा यासाठी या जागा दुपटीने वाढवाव्यात अशी मागणी माजी महापौर सरिता पाटील यांनी केली. सरिता पाटील यांच्या मागणीला पवार यांनी सहमती दर्शवली.
महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना फोन करून प्रस्ताव तयार करण्याच्या संदर्भात चर्चा केली त्याच बरोबर आरोग्य शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना देखील त्यांनी फोन वरून माहिती दिली. ज्योती कॉलेज येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये शरद पवारांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. लवकरात लवकर मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या राखीव जाग्या वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या संदर्भात पावले उचलली आहेत, असे सरिता पाटील यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta